अमळनेर येथे संत सखाराम महाराज पालखी मिरवणूक

0

अमळनेर । शहरात संत सखाराम महाराज यांच्या यात्रोत्सवानिमित्त पालखी मिरवणुक काढण्यात आली. विठ्ठल रुखमईच्या जयघोषात पालखी मिरवणुक सोहळा पार पडला. ढोल ताशांचा गजरात बुधवारी सकाळी 6 वाजता वाडी संस्थानमधून पालखी मिरवणुकीस सुरवात झाली. कडक उन्हातही दर्शनासाठी भाविकांचा उत्साह प्रचंड दिसून आला. वाडी संस्थानापासून निघालेली हि मिरवणूक रात्री 9 वाजता ठिकाणावर पोहचली. सजविलेल्या पालखीच्या मेण्यात लालजींची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. यावेळी देव परिवारा कडून पूजा करण्यात आली पालखीचा मेणावाहून नेण्याची जवाबदारी परंपरे प्रमाणे भोई समाजाच्या कार्यकर्त्यांनी पार पाडली. यावेळी नगराध्यक्षा पुष्पलता पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार आदी उपस्थित होते.

15 तास मिरवणूक
पालखी सोहळ्याला खान्देशातून हजारो भाविकांनी हजेरी लावली वाडी संस्थानातील मंदिरातील लालजींची ऊत्सव मूर्ती पहाटे विधिवत पूजा करून सजविलेल्या पालखीच्या मेण्यात ठेवण्यात आली. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे हि मिरवणूक वाडी संस्थाना पासून निघाली. राजहोळी चौकातून पानखिडकी, सराफ बाजार मार्गे दगडी दरवाजा ,फर्शी पूलावरून ,पैलाड मार्गे ,पून्हा बोरी पात्रात रात्री 8 वाजे पर्यंत पोहचली त्यानंतर कसाली मोहल्यातून वाडी जवळ 10 वाजेच्या सूमारास पोहचून सांगता झाली.

पानसुपारी कार्यक्रम
पालखी मार्गात 200 हून अधिक ठिकाणी प्रसाद महाराजांनी भेटी देवून पान सूपारी चा कार्यक्रम झाला. महाराजांना विशेष बंदूकधारी सूरक्षा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. दगडी दरवाजा पर्यंत व्यापार्‍यांनी सावलीसाठी पालखी मार्गात मंडप टाकले होते त्यामूळे ऊन्हाचे चटके जाणवत नव्हते मात्र भर दूपारी 3 वाजे नंतर पालखी फर्शी पूलावरून गेली त्यावेळी ऊन्हाचे चटके असह्य होत होते.

सीसीटीव्ही बसविले
अमळनेर शहराला लागुन अनेक खेडे गाव असल्याने यात्रोत्सवानिमित्त निघणार्‍या पालखी मिरवणुकीला मोठी गर्दी होती. मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीउ यावर्षी पालखी मार्गावर 15 सीसीटीव्ही कॅमीरे बसविण्यात आले होते. सीसीटीव्हीद्वारे सर्व हालचाली टिपण्यात येत होती. सीसीटीव्हीचे सर्व नियोजन ई -सेक एन्टरप्राईजेस चे संचालक दिपक काटे ( पाटील ) हे करित होते.

बोरी पात्रात गर्दी
चिंचोळ्या गल्लीतून हि मिरवणूक जाते तरीही हजारो स्त्रि पूरूष भाविकांनी शांततेत दर्शन घेतले. सूमारे 15 तास मिरवणूक ढोल ताश्यांच्या गजरात वारकर्‍यांच्या व भजनी मंडळाच्या उपस्थीतीत पार पडली. शहरातील बहूतांश लेझीम मंडळांसह बँड पथक मानाच्या नारळावर या मिरवणूकीत सहभागी झाले. वैशाख वणव्याच्या रणरणत्या उन्हात पालखीच्या मागे सखाराम महाराज संस्थानचे गाधीपती प्रसाद महाराज अनवाणी चालून भविकांना आशीर्वाद देत होते. रात्री उशीरापर्यंत बोरी नदी पात्रात ग्रामिण भागतील भविकांची गर्दी वाढली दिसून आली.

फराळ वाटप
पालखी मार्गात भाविकांसाठी अनेक सेवाभावी संस्थांनी पूढाकार घेत मिरवणुकीत सहभागी भाविकांना मोफत फराळाचे वाटप केले. खिचडी, पोहे ,शिरा, साबूदाणे ,केळी, यासह सरबत,ताक, थंडपाण्याची आदी पेयाची व्यवस्था केली करण्यात आली होती. धार्मिक कार्यक्रम असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरुवारी 11 रोजी वाडी मंदिराजवळ मोहन महाराज बेलापूरकर यांच्या काल्याच्या किर्तनाने सोहळ्याची सांगता होणार आहे. तरी परीसरातील नागरीकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.