अमळनेर येथे साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

अमळनेर : पुज्य साने गुरुजी यांची पुण्यतिथी येथील साने गुरुजी ग्रंथालयात पुस्तक अभिवाचन व गीतगायनाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेस माल्यार्पण व पूजन करण्यात आले. ग्रंथालय तर्फे चालविण्यात येणार्‍या डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन व साहित्य कट्टाच्या अंतर्गत सदर उपक्रम राबविण्यात आला. संत साहित्याचे अभ्यासक व जेष्ठ लेखक डॉ अशोक कामत यांनी लिहिलेल्या ’धडधडणार्‍या मुलांची आई-साने गुरुजी’ या पुस्तकातील उता़र्‍याचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश नाईक यांनी केले. रमण गुरुजी, भरत चौधरी, चित्रा बडगुजर, चंद्रशेखर भावसार, मिलिंद कुंडे, विजयसिंग पवार आदी सह रसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रथपाल सिमा धाडकर, रमेश सोनार, मधुकर बाळापूर यांनी परिश्रम घेतले.