अमळनेर येथे 10 लाभार्थ्यांना गॅस कनेक्शन

0

उज्वला योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त वाटप

अमळनेर– उज्ज्वला गॅस योजनेचा 3 रा वर्धापन दिनानिमित्त आज 10 वंचितांना गॅस वितरीत करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार सर्व सामान्यांचे हे सरकार आहे. हे कृतीतून दाखवून दिले आपण त्यांचे आभार मानले पाहीजे. महिलांची काळजी घेणारे एकमेव प्रधानमंत्री आहेत. असे प्रतिपादन आमदार स्मिताताई वाघ यांनी या योजनेचा वितरण करतांना केले.

गॅस संदर्भात दिली लाभार्थ्यांना माहिती
यावेळी प.स.सदस्या रेखाताई पाटील,माजी जि.प. सदस्य अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, संदीप पाटील, श्रीराम पाटील, येथील भारत गॅसचे वितरक चंद्रकांत देसले, कोतकर, मिलिंद बोरसे, जिजाबराव पाटील, लोंढवे सरपंच कैलास खैरनार सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच सुमनबाई पाटील, माजी सरपंच सिंधुबाई पाटील, कैलास पाटील, सुचिता बहिरम, आनंदा पाटील, नाटेश्‍वर पाटील, रावसाहेब पाटील, जानवे सरपंच, भाजप तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी गजानन शेलकर यांनी ग्रामस्थांना व लाभर्थ्यांना गॅसच्या भिती बाबत माहीती करून दिली. बाळासाहेब जीवन पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना लोंढवे पंचक्रोशीतील ग्रामस्थांना मोदी सरकारच्या विविध योजनांची माहीती करून दिली. त्यात 8 करोड लोकांपर्यंत हे गॅस वितरण होणार आहे. आत्तापर्यंत साडेतीन कोटी कुटूंबाना गॅस वितरीत करण्यात आले आहेत महिला सशक्तीकरण या माध्यमातून हे वितरण बीपीएल घटकातील वंचित महिलांना होणार आहे. 2011 च्या जनगणनेनुसार हा लाभ वितरीत केला जात आहे. या कार्यक्रमाप्रसंगी बोलतांना आमदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले की, अमळनेर तालुक्यात एक हजार 48 बीपीएल कुटुंबाना हे कनेक्शन दिले जात आहे. अशा प्रकारे 70 योजना या सरकारने नव्याने सुरु केल्या आहेत. कंपनीचा कर्मचारी थेट आपल्या दारी येऊन गॅस वापराची माहिती देईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्याम पवार तर सूत्रसंचालन प्रा.मंजुषा खरोटे यांनी केले.