अमळनेर । येथील रेल्वे स्थानकाची रेल्वेचे जी.एम, डी.आर.एम, खासदार ए.टी.पाटील यांनी बुधवारी 12 रोजी सकाळी 10 वाजता भेट घेत तपासणी केली. प्लॅट फॉर्म क्र 2 वर चालू असलेल्या दुहेरी करणाच्या कामाचे निरीक्षण यावेळी त्यांनी केले. खासदार पाटील व सल्लागार समितीच्या सर्व सभासदांनी अधिकार्यांना विविध मागणीचे निवेदन दिले. रेल्वे स्थानकासंबंधी विविध समस्यांच्या यावेळी पाहणी करण्यात आली. प्रवाशांसंबंधी समस्यांची माहिती घेतली.
मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
मालवाहतूक धक्का 15 ऑगस्ट पर्यंत सुरवात होईल, बडोदा ते वाराणसी रेल्वे गाडी आगामी काळात लवकर सुरवात करण्यात येईल अशी माहिती खासदारांनी दिली. यावेळी बजरंग अग्रवाल, सुभाष चौधरी, प्रितपाल सिंग बग्गा, शरद सोनवणे, लालचंद सैनांनी, हरचंद लांडगे, दिलीप जैन, निर्मल कोचर, रमेश कोठारी, जय कोठारी, दिलीप ठाकूर, जुलाल पाटील, कैलास भावसार, दिलीप साळी, व्ही.आर.पाटील, देविदास पाटील, महेश पाटील, अशोक साळुंखे, मच्छिन्द्र लांडगे, भरत पवार, राकेश पाटील, सुरेंद्र बोहरा, अमोल जाधव व पदाधिकारी कार्यकर्ते प्रवासी उपस्थित होते.