अमळनेर रेल्वे स्थानकाला जी.एम.ची भेट

0

अमळनेर। सुरत अमरावती एक्सप्रेस व सुरत भुसावल पॅसेंजर या गाड्या सुरतपर्यत न जाता अमळनेर अमरावती अमळनेर भुसावल पॅसेंजर सुरू करण्यात यावे, 11 जून पर्यंत बंद असलेल्या पॅसेंजर गाड्यामुळे प्रवाश्यांचे होत असलेले हाल कमी कराव्या तसेच सर्व एक्सप्रेस गाड्यानां अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा या मागणीसाठी गुरुवारी 25 रोजी जनरल मॅनेजर ए.के.गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.

जी.एम. हे मुंबई येथून अमळनेर येथे रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील, लालचंद सैनानी, डॉ.राजेंद्र पिंगळे, झुलाल पाटील यांच्या सह स्थानिक स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य प्रितपालसिंग बग्गा, हरचंद लांडगे, निर्मल कोचर, रमेश कोठारी उपस्थित होते.