अमळनेर । येथील नगरपरिषदच्या विविध विषय समितीच्या सभापती निवड अमळनेर नगर परिषद कार्यालयात बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या हाकेला सात देऊन सत्ताधारी व आमदार शिरीषदादा मित्र परिवाराच्या गटाने शहराच्या विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला 15 जानेवारी रोजी सभापती निवड प्रसंगी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे 4 सभापती तर आमदार शिरीषदादा मित्र परिवार गटाला एक सभापती चा बहुमाण मिळाला. अशा प्रकारे नेहमी गाजत असलेल्या संघर्षाला समनव्याचे चित्र स्पष्ट झाले. यात सार्वजनिक बांधकाम समिती सभापती मनोज पाटील, पाणीपुरवठा व जल निस्सारण समिती सभापती राजेश पाटील, स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती संजय भिल यांची फेर निवड करण्यात आली तर महिला व बाल कल्याण समिती सभापती अॅड. चेतना यज्ञेश्वर पाटील, शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती देवीदास महाजन (आमदार शिरीष दादा मित्र परिवार आघाडी) यांची निवड करण्यात आली. नियोजन समितीच्या अध्यक्षपदी पद सिद्ध सभापती व उपाध्यक्ष विनोद लांबोळे स्थायी समिती सभापती विवेक पाटील, संजय मराठे, प्रविण पाठक यांची फेर निवड करण्यात आली.