अमळनेर शहराची राज्यस्तरीय समितीकडून पाहणी

0

अमळनेर। केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर राज्य हागणदारीमुक्तीचे संकल्प करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जळगाव जिल्हा उद्दिष्टपुर्तीच्या जवळ पोहोचला आहे. दरम्यान राज्यस्तरीय समितीने अमळनेर शहराची पाहणी केली असता. शहर हागणदारी मुक्तीबाबत सकारात्मक कामगिरी असल्याचे अहवाल बुधवारी 14 रोजी नगरपालिकेस प्राप्त झाला आहे.

राज्यस्तरीय समितीनंतर केंद्रीय समिती सर्वेक्षण करणार असून केंद्रीय समितीच्या अहवाला नंतर शहर हगणदारीमुक्त घोषीत करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्वच्छता समितीत अहमदनगर महापालिका उपायुक्त भालचंद्र बेहरे, शिरूर मूख्याधिकारी विद्या पोळ, श्री.अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष सुनिल वाणी, गोपी लांडगे आदींचा समावेश होता.

शहरात समितीने 13 जून व 14 जून रोजी अमळनेर नगरपरिषदेने हागणदारी मुक्तीसाठी केलेले कार्याची माहिती घेतली. यामध्ये शहरातील नागरिक, नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले. सार्वजनिक शौचालय ही अत्यंत चांगल्या दर्जाची असून सुविधा व स्वच्छता चांगली असल्याने नागरिकांकडून त्याचा वापर केला जात असल्याचे व त्याबाबतीत नागरिक समाधानी असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत समितीस आढळून आले.
शौचालयाची 2 हजार 448 उद्धिष्ट असून 2 हजार 325 शौचालये पूर्ण झालेले आहेत.