अमळनेर : येथील सुभाष चौक ते नगरपालिका भागातील अतिक्रमित पान टपरी, हातगाड्या, सोडा गाडी, किरकोळ धंदेवाईकांचे अतिक्रमण पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नगर परिषदेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने आज काढले. अमळनेर शहरात गेल्या काही दिवसांपासून किरकोळ वादांमुळे अमळनेर शहराचे नाव गाजत होते.मात्र त्या वादाला आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाद्वारे आज शुक्रवार 9 डिसेंबर रोजी सकाळी10 वाजता पोलीस प्रशासनाने अतिक्रमण मोहीम हाती घेऊन व नगरपरिषदेच्या सहकार्याने न. पा.ते सुभाष चौक पर्यंत असणार्या अतिक्रमित पान टपरी, हातगाड्या, चहाचे दुकान, बोर्ड आदि अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवली.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
यावेळी नगरपरिषदे तर्फे मनुष्यबळ व ट्रॅक्टर पुरविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक विकास वाघ, पोलीस उपनिरीक्षक देविदास बिर्हाडे, सुनील हटकर, भास्कर पाटील, विजय साळुंखे, राजेंद्र पाटील, महेंद्र पाटील व राखीव पोलीस बल गट उपस्थित होते. या मोहिमेत नगरपरिषद अतिक्रमण विभाग प्रमुख राजाराम पाटील, चंदू बिर्हाडे, कुंदन सोनावणे, सुधाकर सोनवणे, यश लोहेरे, राजेश पथरोड, सुरेश चव्हाण आदि कर्मचारी उपस्थित होते.