अमळनेर। येथील छायाचित्रकार संजय जगताप यांच्यासह 19 ऑगस्टच्या जागतिक छायाचित्र दिनामित्त कार्यगौरव करण्यात आला. अंबिका मंगल कार्यालयात हा सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी तहसिलदार प्रदिप पाटील होते. संजय जगताप, नंदु विसपुते, राजुभाऊ चौधरी, पंकज अहिरराव, गिरीष भोळे मुक्तार अली सय्यद, जगदिश मोरे आदींचा सत्कार करण्यात आले.
नाशिक येथील 2015 मध्ये पार पडलेल्या सिंहस्थ कुंमेळ्यातील जगताप यांनी काढलेल्या छायाचित्रांची दखल युनोस्को या जागतीक संघटनेने घेत या छायाचित्र जागतीक वारसा म्हणुन संग्रहीत करावे असा ठराव केला आहे. छायाचित्रकार बांधवाच्या पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या मुलांचा कोणीच विचार करणार नाही वा कौतुक करणार नाही.म्हणून आपण आपल्या मुलांचे कौतुक करावे असे ठरले व त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.