अमळनेर : शहरातील मिठाई विक्रेत्याला शिविगाळ करीत दुकानात दगड मारून दुकानदाराकडील रोकडसह मोबाईल ब्लूटूथ लांबवण्यात आल्याची घटना 24 रोजी दुपारी अडीच वाजता घडली. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिविगाळ करीत मारला दगड
न्यु जवेरचंद नाथालाल मिठाईवाला दुकानाचे संचालक विशाल सुनील खिलोसिया (34, शनी मंदिर, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या तक्रारीनुसार, 24 रोजी दुपारी अडीच वाजता संशयीत तन्वीर शेख मुक्तार (अमळनेर) याने दादागिरी करीत दुकानात प्रवेश करीत दगड भिरकावल्याने घड्याळाचा काच फुटला तसेच दुसरा दगड उगारत जीवे ठार मारण्याची धमकी देत खिशातील 450 रुपयांची रोकड व 1200 रुपये किंमतीचे ब्लूटूथ हिसकावून पळ काढला. तपास नाईक कैलास पवार करीत आहेत.