अमळनेर । येथील भारतीय जैन शाखा व पुण्याच्या संचेती हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने शहरात नुकतेच अस्थिरोग निदान शिबीराचे आयोजन सुदीप मेडिकलच्या हॉल मध्ये करण्यात आला. शिबिरात सुमारे 270 रुग्णांनी सहभाग नोंदवून तपासणी करण्यात आली. संचेती हॉस्पिटलचे डॉ. हिमांशू कुलकर्णी, डॉ. शंतनू गुजाला, डॉ. मेघराज होळांबे, डॉ. सागर दवे, डॉ.अनुशा, डॉ.गायत्री या तज्ञ डॉक्टरांनी केली. या शिबिराच्या आयोजनासाठी संचेती हॉस्पिटलचे रोहन पान पाटील व अमळनेरचे डॉ.प्रकाश जैन यांनी सहकार्य केले.
या शिबिरास खाशी मंडळाचे माजी चेअरमन दिलीप जैन यांचे विशेष सहकार्य लाभले. सदरचे शिबीर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश जैन, संचालक डॉ.अरुण कोचर, डॉ.रविंद्र जैन, धर्मेंद्र कोठारी, नितीन शहा, रोहित सिंघवी, सुरेंद्र कोठारी, पियुष ओस्तवाल, प्रकाश छाजेड, भारत कोठारी, सचिन चोपडा, राजेंद्र दसेर्डा आदींनी मोलाचे सहकार्य केले. सदर शिबिराचे सूत्र संचालन प्रा.डॉ. अरुण कोचर यांनी तर आभार रवींद्र जैन यांनी व्यक्त केले.