अमळनेर : देव धर्माच्या नावाने कर्म कांडाला अधिक महत्व प्राप्त झाल्याने विज्ञान युगातही मानव अंधश्रधेकडे झुकु लागला आहे. डोळस श्रद्धा ठेवली हाच महत्वाचा देव आहे त्यापासून समाजाला शिकवण मिळते. देवधर्म का देव धंदा या संकल्पनेकडे सर्वानी सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. आज पृथ्वीचे आयुष्य 460 कोटी वर्षाचे आहे. निसर्ग चक्रात पृथ्वीप्रमाणे चंद्र, तारे, आकाशगंगा यांची निर्मिती झाली असे शास्रज्ञाचे मत आहे. नैसर्गिक आपत्तिला मानव घाबरायला लागला त्यातूनच श्रद्धा निर्माण झाली. असे मत डॉ.बी.एस.पाटील यांनी देव धर्म आणि देव धंदा या विषयावरील प्रवचन प्रसंगी व्यक्त केले. नाविन्य प्रतिष्ठानतर्फे प्रवचन मालेचा उपक्रम गेल्या वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आयोजित प्रवचन प्रसंगी ते बोलत होते.
90 टक्के लोक आस्तिक
आज जगातील 90 टक्के लोक आस्तिक आहेत तर 10 टक्के लोक नास्तिक आहेत. देव, आत्मा, मन हे अदृश्य आहेत. देव कोणी पाहिला आहे का? हा देखील एक प्रश्नच आहे. संत या समाजात आधी निर्माण झाले नंतर विज्ञानाची उत्पती झाली त्यामुळे समाजात आस्तिक-नास्तिक असे गट निर्माण झाले आहेत. संतानी समाजाला योग्यच मार्ग दाखविला आहे. विज्ञानाने देव या संकल्पनेस आव्हान दिले आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, सानेगुरूजी यांनी समाजास मोलाचा संदेश दिला आहे.
भव्य मंदीराची उभारणी करून धंद्यासाठी वापर
समय से पहीले व भाग्य से अधिक कुछ नहीं मिलता असे जरी म्हटले जात असले तरी प्रयत्न करणारा संघर्षातुनही यश मिळवतोच. मानवाने नेहमीच प्रयत्नवादी राहिले पाहिजे. देवधर्माच्या नावावर भव्य मंदिरांची उभाराणी करुन त्यांचा व्यापार करणार्यांनी धंदा सुरु केला आहे. सर्वानी या फसविणार्या घटकांपासून दूर राहिले पाहिजे. सर्व सुख सोयी उपलब्ध असतानाही निराशेने ग्रस्त मानव आत्महत्या का करतो. त्यापासून त्याला वचविन्यासाठी मनशांतीचा मार्ग निवडला पाहिजे. असे डॉ.पाटील म्हणाले, कार्यक्रमाचे प्रस्ताविक शरद सोनवणे यांनी केले. 25 डिसेंबर हा दिवस अटल बिहारी वाजपेयी, नौशाद, पं.मदन मोहन मालवीय यांचा जन्मदिवस तर चार्ली चॅपलीन यांचा स्मृतिदिन असल्याचे सांगितले. कार्यक्रमास सर्वच स्तरावरिल श्रोत्याची उपस्थिती होती. आभार प्रदर्शन शरद सोनवणे यांनी मानले.