अमळनेर। शहरातील स्टेशन रोडवरील स्टेट बँकेसमोरील कोठारी अलंकार, अजय मेडीकल्स व महेश गेस्ट हाऊस मधील जे.पी.ड्रायफ्रुट, येथे पहाटे 4 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लूट करून पोबारा केल्याची घटना घडली आहे. स्टेट बँकेसमोरील भागात दुकाने फोडणे ही बाब देखील तितकी गंभीर आहे. कोठारी अलकांर येथील गल्ल्यातील 22 हजार रोख रक्कम, तीन हजार रूपये ईमिटेशन ज्वेलरी, शो वस्तूंची लुट करण्यात आली आहे. याबाबत ही माहिती दुकानावरील रहिवासी अजय सासवानी यांनी ही बाब मालक जवरीलाल कोठारी यांना दूरध्वनीवरून दिली तर अजय सासवानी यांचेही अजय मेडिकलमध्येही चोरी झाल्याचे ते खाली आल्यावर कळाली. त्यात त्यांनी 26 हजार रुपये रोकड आणि सीसीटीव्हीचा डिव्हीआर लंपास केला तर जेपी ड्रायफ्रूटचे मालक अमित सैनानी यांचेही 30 हजार रुपयांचे ड्रायफ्रूट व सीसीटीव्हीचा डिव्हीआर लंपास केले आहेत.
चोरट्याच्या गाडीचे मोबाईल रेकॉर्डिंग
पहाटे झालेल्या या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. सध्या गणेशोत्सव धामधूम असतांना चोरट्यांनी दुकानांवर लक्ष केंद्रित केल्याचे सदरील घटनेवरून जाणवते विशेष म्हणजे कोठारी अलंकार या दुकानाला एक शटर सेंट्रल लॉक, 2 बाजूचे लॉक त्यामध्ये लोखंडी चॅनेल गेट त्याला दोन लॉक असे एकूण पाच कुलुपे तोडून अवघ्या काही मिनिटात चारचाकी वाहनाने चोर पसार झाले. यात सदर चोर्यांची गाडीचे मोबाईल रेकॉर्डिंग देखील अजय सासवानी यांनी केले आहे. त्यात गाडी (एमच 13 टी 1396) व सिल्व्हर रंग असलेली चारचाकी आढळून आली आहे. याबाबत तिन्ही दुकानमालकांनी अमळनेर पोलिसात तक्रार केली आहे. विशेष बाब म्हणजे स्टेट बँकसमोर ही दुकाने असून एटीएमसमोर आहे व मुख्य दरवाजा देखील याकडेच आहेत. यासह स्टेट बँकेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना रेकॉर्ड झालेली असेल अशी शक्यता आहे यावरून पोलिसांना धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.