अमळनेर शहरात मुस्लिम समाज बांधवाची बैठक उत्साहात

0

अमळनेर । शहरातील फैजाने चिश्तीया बहुउद्देशीय संस्था संचलित सुन्नी दारूल कजाच्या वतीने मुस्लिम समाजाची बैठक नुकतीच घेण्यात आली. सुन्नी दारूल कजाच्या कार्यालयात मुस्लिम समाजाची शहर मिटिंग हाजी फिरोजोदीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. सदरील मिटिंग जशने ईद-ऐ -मिलादुननबी जुलुस या विषयावर चर्चा करण्यात आली.

जुलुस मिरवणुकीत डिजेचा वापर न करता जुलुस उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आयोजित मिटिंगमध्ये मुस्लिम समाजचे सामाजिक कार्यकर्ते हाजी नसीरोदीन शेख, हाजी अब्दुल कादर, जनाब इकबाल शेख, अ‍ॅड. साजिद शेख सह आदि बांधवांनी मनोगत व्यक्त केले. मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त जुलुस मिरवणूकी विना डिजेची व शांततेत पार पडावी, असे आवाहन नगरसेवक सलीम टोपी, अब्दुल सत्तार, तेली हाजी, अब्दुल सत्तार शेख, फयाज पठाण कुरेशी, रियाज काझी, अ‍ॅड. सलीम खान, अब्दुल जब्बार भाई, मसुदखा मिसतरी, हाशमअली सैय्यद, फिरोज मिस्तरी, जहुर पठाण, शब्बीर पहेलवान, गुलाम नबी, फारुख सुरभि, कलेक्शन फयाज यांच्यासह शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.