अमळनेर। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गच्या 500 मीटरच्या आत येणारे शहरातील मोजकेच बार बंद असून बाकीचे सताड उघडे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या छुफा आशीर्वादाने न्यायालयाच्या आदेशाची उघड पायमल्ली होत आहे, न्यायालयाच्या आदेशाने शहरातील दारू बंद तर झालेलीच नाही उलट वाढत्यादराने खुलेआम विक्री सुरु आहे. शहरात बिअर बार, बिअर शॉपी, देशी दारूची एकूण 35 दारू दुकाने आहेत. झामी चौकातील देशी दारूचे एक दुकान वगळता सर्वच बिअर बार, बिअर शॉपी आणि एक देशीचे दुकान हि 500 मीटरच्या आत येतात. न्यायालयाचा आदेश येताच येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्यांनी दारू दुकानांना सील केले. मात्र नाममात्र सील केलेली दुकाने वगळता इतर बिअरबारमधून दारूविक्री सरार्स पणे सुरु आहे. उलट न्यायालयाच्या आदेशामुळे दुकानदार दारू छापील किंमती पेक्षा अधिक किंमतीने विकत आहे.
खानावळीतही खुलेआम दारूपिने सुरूच सुरु
एका 180 एम एलच्या बॉटलची किंमत सुमारे 200 रुपयाने वाढली आहे. हि किंमत दारूच्या ब्रँड नुसार बदलत आहे. इतकेच नव्हे तर 54 ची देशी क्वाटर 150 रुपयाला विक्री होत आहे. बार वगळता शहरात आणि शहराबाहेर ज्या मांसाहारी खानावळी सुरु आहेत. त्या खानावळीत खुलेआम दारूपिणे सुरु आहे. शहरातील अनेक बार मालकांनी न्यायालयाच्या आदेशाने आपली दुकाने बंद ठेवली आहेत, मात्र दारू बंदी विभागाच्या अधिकार्यांशी ज्यांची सेटलमेंट झाली आहे ते खुलेआम दारूविक्री करत आहेत व आपल्या खानावळीत दारू पिऊ देत आहेत. याबाबत उत्पादन शुल्क विभागाचे बि जी अहिरराव यांच्याशी संपर्क केला असता त्यानी सांगितले की, माझ्या कडे पारोळा अमळनेर, आणि चाळीसगाव या तीन तालुक्याचा प्रभार असून ही दिवसभर शहरातील दुकानाची पाहणी केली असे सांगितले.
तीन तालुक्याचा चार्ज असून ही आज दिवसभर आपण दुकानाची पाहणी केली, मात्र तरीही शहरात ज्या खानावळीत आणि बारमध्ये खुलेआम दारू विकली जात असेल त्यावर मंगळवारी कारवाई केली जाईल.
बी.जी.अहिरराव, दुय्यम निरीक्षक