अमळनेर : अमळनेर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी शीतल सुखदेव देशमुख यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत सर्वसामान्यांसह सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली. यात सरचिटणीसपदी दिलीप ठाकूर, उमेश वाल्हे यांची नियुक्ती झाली आहे. या कार्यकारिणीत 1 अध्यक्ष, 7 उपाध्यक्ष, 2 सरचिटणीस, 1 कोषाध्यक्ष, 8 चिटणीस, 1 प्रसिद्धी प्रमुख यांच्यासह कार्यकारिणी सदस्य विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. लवकरच विविध आघाड्या सेलचे अध्यक्षही जाहीर करण्यात येणार आहेत. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ आमदार स्मिता वाघ यांच्या मार्गदर्शनाने हे पदाधिकारी कार्यरत राहतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
शहरकार्यकारिणी पुढील प्रमाणे
अध्यक्षपदी शीतल देशमुख, उपाध्यक्ष शरद सोनवणे, भरत ललवाणी, चंद्रकांत कंखरे, विक्रांत पाटील, रवींद्र कदम, दीपक पाटील, माधुरी पाटील, सरचिटणीस दिलीप ठाकूर, उमेश वाल्हे, चिटणीस संध्या शहा, विवेक पाटील, दीपक भोई, महेंद्र महाजन, संजीव बाबुराव पाटील, तुळशिराम हटकर, परमेश्वर सैदाणे, प्रा.रामकृष्ण पाटील, कोषाध्यक्ष कमल कोचर, प्रसिद्धी प्रमुख शेखर कुलकर्णी. तर सदस्यपदी दीपक साळी, विजय वानखेडे, मोतीराम हिंदुजा, मच्छिंद्र लांडगे, दिलीप सैनानी, भास्कर कोल्हे, प्रितपालसिंग बग्गा, सुभाष शर्मा, गोकुळ पाटील, देवसिंग इच्छे, वामन साळुंखे, प्रताप चौधरी, जयंतीलाल वानखेडे, संजय पाटील, अशोक चौधरी, लता सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.
यांचा विशेष आमंत्रित सदस्याचा समावेश
उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, डॉ.बी.एस.पाटील, सुभाष चौधरी, बजरंगलाल अग्रवाल, प्रभाकर कोठावदे, लालचंद सैनानी, अजय केले, प्रभाकर पाटील, श्यामदास लुल्ला, शुभदा करमकर, गणेश चौधरी, डॉ. संदेश गुजराथी, देविदास पाटील, गिरीश पाटील, भालचंद्र मिस्तरी, शिवाजी सैंदाणे, देवानंद पाटील, अनिल लाड, विकास शिंपी, सुरेखा निकुंभ,विनायक शिंदे आदी.