अमळनेर : संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त अमळनेर नगरपरिषद क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 2448 वैयक्तिक शौचालयाचे उद्धिष्ट असून यासाठी अमळनेर नगरपरिषद सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संपूर्ण शहर हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला. सभेचे अध्यक्ष स्थाणी प्रभारी नगराध्यक्षा स्वाती पाठक मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे प्रशासनाधिकारी भाऊसाहेब देशमुख जेष्ठ पत्रकार नामदेवराव पाटील हे व्यासपीठावर होते. त्याच बरोबर नगरसेवक विविध विभागाचे शासकीय अधिकारी महाविध्याल्याचे प्राचार्य स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी बचत गट सदस्या स्वच्छतादूत आदि उपस्थित होते.
शहरातील सुमारे दहा व्यक्ती बसतात उधड्यावर
शहरात 2448 वैयक्तीक शौचालयासाठी मंजूर असून 3970 नागरिकांना अनुदान दिले आहे. त्यापैकी 1002 शौचालयाची कामे झाली आहेत. तर 2000 नागरिकांनी अनुदान घेऊनही. शौच्चलाय बांधली नाही त्यामुळे शहरातील सुमारे दहा हजार स्री पुरुष उधड्यावर जातात. याबाबत जनजागृती नपा प्रशासनाने केली असून देखील नागरिक निर्लज्जपणे फोटो काढू देतात त्यांना फुले देऊनही उपयोग होत नाही. याबाबत कठोर भूमिका न.पा. प्रशासनाने घेऊनही उपयोग न झाल्याने अखेर पोलीस प्रशासनाला शासनाने दिलेल्या अधिकारानुसार यापुढे कठोर पाऊले उचलून कठोर कारवाई केली जाईल. शौचालय बाधने दुरुस्ती तसेच पे युनिटद्वारे देण्याचे टेंडर काढले आहे शहरातील सिंधी कॉलनी व आर के नगर भागात शौचालय बांधली असून त्यांना टाक्या नाहीत व गटारीत पाईप टाकून एका विहिरीत तो मैला टाकला आहे तिथे सेफ्टी टाक्या बांधण्यासाठी 17000 हजार अनुदान देणार आहोत शहरात एकूण 32 ठिकाणी नागरिक उघड्यावर शौच्चस जातात त्याठिकानाचे कुंपण नलिकेचे पाणी पिण्यास वापरण्यास योग्य नसल्याचे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले. ते पान्याची तपासणी केली तर ते पाणी दूषित मैला युक्त असेल त्यामुळे नागरिकांना विविध आजार होतील नपा चे वैदयकिय अधिकारी डॉ आर एस पाटील यांनी सांगितले उघड्यावर शौच्यास गेल्याने त्यापासून होणारे आजार व समाजावर होणारे परिणाम याविषयी उपस्थितीत नागरिकांची जनजागृती करतांना सांगितले कि, उघड्यावर बसल्यामुळे त्यावर बसणार्या माश्या ह्या अन्न घटकावर बसल्याने ते जंतू पोटात जातात आणि अन्नातील महत्वाचे घटक जंतू मोठया प्रमाणावर घेतात. त्यामुळे आपल्या शरीराला म्हत्वाचे घटक मिळत नाही म्हणून शहरात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे दर सहा महिन्यांनी ह्यावर उपाय म्हणून शाळामध्ये विध्यार्थ्यांना जंत नाशक गोळया पुरविल्या जातात यामागे नपाचा मोठा निधी खर्च होतो.
स्वच्छतागृहांचा वापर व बांधकामासाठी केले प्रबोधन
सर्व नागरिकांनी व उपस्थितांनी 100 टक्के शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी व लोकांना स्वच्छतागृहांचा वापर व बांधकाम करण्यासाठी प्रबोधन केले तर यापुढे अशा समस्यां उदभवणार नाहीत असे सांगितले तर यावेळी स्वच्छतादूत संदीप घोरपडे, संजय पाटील, उमेश धनराळे, डिगंबर महाले यांनी माहिती दिली. तर अमळनेर शहरातील शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी 20 डिसेंबर रोजी आपापल्या कार्यालयाची परिसराची स्वच्छता ठेवावी. तर यावेळी प्लास्टिक निर्मुलना बाबत माहिती देऊन चैतन्य बहुउद्देशीय संस्था मार्फत कापडी पिशव्यां कमी दरात उपलब्ध करून दिल्या आहेत. तर स्वयंसाह बचत गटांनी या अभियानात सक्रिय सहभागाबद्दल धनादेश व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संजय चौधरी, भाऊसाहेब देशमुख, आरोग्य सभापती नीता कांबळे, श्रीराम चौधरी, प्रवीण पाठक, महावीर पहाडे, चेतन सोनार, नंदकुमार भांडारकर, अॅड सुरेश पाटील यांच्यासह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.