अमळनेर 6 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर

0

अमळनेर । तालुक्यात 6 ग्रामपंचायती पैकी पाच ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता प्रस्थापित केल्याचा दावा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी केला आहे. एकुण 6 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 87.47 टक्के मतदान घेण्यात आले. यावेळी सडावन येथे सरपंचपदी रत्नबाई पंढरीनाथ भिल (567), रडावन-राजोरे येथे सरपंचपदी सुंदरबाई ढोमन पाटील (584), शिरसाळे बु येथे सरपंचपदी युवराज भाऊराव पाटील (755), पिंपळे बु येथे सरपंचपदी दिनेश प्रेमराज पाटील (824), नंदगाव – लडगाव येथे सरपंचपदी मंगला सुधाकर पाटील यांचा अवघ्या चार मतांची आघाडी घेत सरपंचपद मिळविले त्यांना (669), मठगव्हाण येथे सरपंचपदी माया प्रवीण वाघ (623) याप्रमाणे निवड करण्यात आली आहे. प्राधिकृत अधिकारी म्हणून तहसीलदार प्रदीप पाटील यांनी काम पाहिले मतमोजणीला निवासी नायब तहसीलदार कमलाकर जोशी, नायब तहसीलदार प्रशांत वाघ, नितीन ढोकणे, संदीप पाटील, सुधीर गरूडकर, योगेश पाटील, अशोक ठाकरे यांनी सहकार्य केले.