अमळनेर । अमळनेर परीसरातही भीमा कोरेगाव येथे काल झालेल्या घटनेचा पडसाद उमटला आहे. अमळनेर बसस्थानकात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास तीन बसेच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. तर मंगळवारी दुपारी 1 ते 2 वाजेच्या सुमारास चार बसेसेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या घटनेत आज ठिकठिकाणी बसेसच्याकाचा फोडून दहशत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चोपडा रोड, गलवाडे रोड, धुळे रोड, पारोळा रोड वरील वाहने काही काळ ठप्प झाला होती. नुकसान झालेले बसेस याप्रमाणे – शिंदखेडा (एमएच 14 बीटी 2086), नवापूर (एमएच 14 बीटी 2114), शिरपूर (एमएच 20 बीएल 0937), अमळनेर (एमएच 06 एस 8493), (एमएच 40 9029), (एमएच 14 बीटी 1851) आणि (एमएच 19, 9072) या बसेस अमळनेर आगारात जमा करण्यात आले आहे. या घटनेत एक बस चालक जखमी झाला आहे.
जामनेरातही परिणाम
जामनेर । भिमा कोरेगावा येथील विजय स्तंभाचा वंदन प्रसंगी झालेल्या प्रकारामुळे जामनेरातही पडसाद उमटला आहे. नगरपालिका चौकात बसवर दगड फेक करण्याचा प्रयत्न झाला परंतू आंदोलनासाठी काही जागरूक नागरीकांच्या समय सुचकतेने तो प्रयत्न हानून पाडला. दरम्यानी वाकी रोडवर एका मार्केटमधील दुकाने बंद करण्याचा आंदोलनकर्त्यांनी घाट घातला होता मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत शांततेचे आवाहन केले. तहसीलदार टिळेर यांना सामाजिक संघटनांकडून लेखी निवेदन देण्यात आले. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान नेरी औरंगाबाद रस्त्यांवर काही आंदोलनकांनी बस रोखत आंदोलन केल्याचा प्रयत्न केला आहे.