अमळेनर शहरातून 10 जून रोजी निघणार पंढरपुरसाठी पायीवारी

0

अमळनेर । संत सखाराम महाराज संस्थानची पंढरपूरसाठीची पायीवारी आज 10 जून रोजी संत प्रसाद महाराज यांचे प्रमूख मार्गदर्शनाखाली पैलाड येथील तूळशीबागेतून निघेल 22 दिवसाच्या मूक्कामानंतर हि दिंडी 2 जूलैला पंढरपूरात दाखल होईल. महाराजांच्या या दिंडीचे अखंडीत 30 वे वर्ष आहे या बाबत वाडी संस्थान मध्ये प्रसाद महाराजांनी यात्रोत्सव शांततेत उत्साहात पार पडल्याचे समाधान व्यक्त केले. हि दिंडी ज्या गावी पोहचते तेथे त्या दिवशी जोरदार पाऊस पडतो मात्र अमळनेरात त्या ऊलट होते बहूंताश वर्षी पहिला पाऊस महाराजांची दिंडी रवाना झाल्यानंतर च पडतो हा जाणकारांचा अनुभव आहे मात्र या वर्षी दिंडी रवाना होण्यापूर्वीच दमदार पाऊस पडला. या निघणार्‍या पायीवारीत 200 ते 250 वारकरी सहभागी होणार आहेत.