अमानुषतेचा कळस; 80 वर्षीय वृद्धेवर बलात्कार

0

तळवडेतील रुपीनगरातील घटना

पिंपरी-चिंचवड : पिंपरीतील तळवडे येथील रूपीनगर झोपडपट्टीत राहणार्‍या एका वृद्ध महिलेवर (वय 80) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात व्यक्तीने घरात शिरून केले दुष्कृत्य
पिंपरीत राहणार्‍या या वृद्ध महिलेवर 13 जानेवारीच्या मध्यरात्री बलात्कार झाला. घरात एकट्या झोपल्यानंतर घराचा पत्रा उचकटून एक व्यक्ती घरात शिरली व त्याने बळजबरीने बलात्कार केला असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. मुलगा घरी आल्यानंतर रात्री घडलेला सर्व प्रकार मुलाला सांगितल्यानंतर मुलाने तातडीने आईला घेऊन देहूरोड पोलिस ठाणे गाठले व त्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवली. पोलिस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल होताच पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली यात महिलेवर अतिप्रसंग झाल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोरकर हे करीत आहेत.