चाकण : खेड तालुका प्रेस क्लबची विशेष सर्वसाधारण सभा नुकतीच हरिदास कड यांच्या अध्यक्षतेखाली चाकण येथे संपन्न झाली. त्यामध्ये दैनिक जनशक्तीचे पत्रकार अमितकुमार भरतराव टाकळकर यांची खेड तालुका प्रेस क्लबच्या सहसचिव पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. उपाध्यक्ष कल्पेश भोई यांनी ठराव मांडला व सचिव हनुमंत देवकर यांनी त्यास अनुमोदन दिले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचे विभागीय अध्यक्ष शरद पाबळे व पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णकांत कोबल यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य संजय बोरकर, प्रभाकर जाधव, अयाज तांबोळी, मिलिंद शिंदे व सागर घाटकर आदी सदस्य उपस्थित होते. या नव्या जवाबदारीने सामाजिक आत्मभान अधिकच दृढ झाले असून पत्रकारांच्या न्याय्य हक्क व मागण्यांसाठी सर्व पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे टाकळकर यांनी निवडीनंतर सांगितले.