अमिताभ बच्चन, सोनी चॅनेलविरोधात भाजपकडून पोलिसांत तक्रार

0

मुंबई: “कौन बनेगा करोडपती” (केबीसी) या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हिंदूची भावना दुखविल्याचे आरोप करण्यात आले असून अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही चॅनेलवर भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांत अमिताभ बच्चन आणि सोनीविरोधात तक्रार दिली आहे.

“कौन बनेगा करोडपती” या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते धर्म ग्रंथ जाळले? असा प्रश्न विचारला होता. यावर भाजपने आणि विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. समस्त हिंदूंचा हा अपमान असल्याचे आरोप करण्यात आले आहे.