मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी ही दोन्ही नावं बॉलिवूडमध्ये मोठी आदरानं घेतली जातात. या दोन्ही कलाकारांच्या अभिनयाचे अनेक चाहते असून या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अमिताभ – शबाना ही दिग्गज कलाकारांची जोडी तब्बल ३० वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत . दिग्दर्शक अनुराग बासू या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
१९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैं आजाद हूं’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर २००७ मध्ये ‘ओम शांति ओम’ चित्रपटात एका गाण्यासाठी त्यांनी पाहुणे कलाकार म्हणून हजेरी लावली होती. अनुराग बासूच्या चित्रपटामुळे आता या जोडीचा अभिनय मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे.
अनुराग बासूच्या या आगामी चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आले नाही. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि शबाना आझमी यांच्यासोबत सैफ अली खान, आदित्य रॉय कपूर, तापसी पन्नूदेखील भूमिका साकारणार आहेत.