मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा मुंबई दौरा निश्चित झाला होता. मात्र हा दौरा रद्द झाला आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात शिवसेना-भाजपा युतीच्या भवितव्यावर शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात होते. पण दौरा रद्द झाल्याने युतीच्या चर्चेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठरल्याप्रमाणे निम्म्या जागा मिळणार नसतील तर युती कठीण असल्याचे दिवाकर रावते यांचे विधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन तसेच अमित शहांनी महाराष्ट्रात भाजपची सत्ता पूर्ण बहुमतात येणार असल्याचे सांगितल्याने युतीचे भवितव्य काय अशी चर्चा सुरु आहे. शिवसेना आणि भाजपाचे नेतेदेखील उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात चर्चा सुरु असल्याचे सांगत बोलणे टाळत आहेत.