अमित शहांचा सांगली – कोल्हापूर २४ जानेवारीचा दौरा रद्द

0

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहेत. भाजपने देखील निवडणुकीसाठी तयारी सुरु केली असून त्या अनुषंगाने दौरा आणि सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा सांगली- कोल्हापूरचा दौरा करणार होते. येत्या २४ जानेवारीला अमित शहांचा सांगली- कोल्हापूर दौरा होता. अमित शहा यांना स्वाईन फ्ल्यू झाल्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र उद्या अमित शहा यांची पश्चिम बंगालमध्ये भव्य सभा होणार आहे.