अमित शहांनी राज्यसभेत मांडले #CAB ; सणसणीत भाषणात विरोधकांना टोलवले !

0

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत बहुमताने संमत झाले आहे. दरम्यान आज बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक राज्यसभेत मांडले असून विधेयकाबाबत प्रस्तावना त्यांनी केली. भाजपने निवडणुकीच्या घोषणापत्रात नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लागू करण्याचे आश्वासन दिले होते. जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिल्याने, जनतेची हे विधेयक मंजूर व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळेच हे बिल आणले असून कोणीही याला विरोध करू नये असे आवाहन अमित शहा यांनी केले. एकाही समाजावर अन्याय होणार नाही असा दावाही अमित शहा यांनी केले. जगभरातून मुस्लीम व्यक्ती जर भारतात आले तर त्याला नागरिकत्व देता येणार नाही. पाकिस्तानातून जर मुस्लीम आले तर त्याला कसे नागरिकत्व द्यावे असा प्रश्न देखील अमित शहांनी विरोधकांना केले.

राज्यसभेत या विधेयकावरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. लोकसभेत भाजपचे पूर्ण बहुमत असतानाही तब्बल आठ तासांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीनंतर हे विधेयक सोमवारी मध्यरात्री संमत करण्यात आले. राज्यसभेत बहुमत नसले तरी हे विधेयक मंजूर होईल असा विश्वास सत्ताधारी पक्षाकडून व्यक्त होत आहे.

पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून आलेल्या बिगरमुस्लीम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आले आहे. विरोधकाच्या प्रचंड गदारोळात २९३ विरूद्ध ८२ मतांनी हे विधेयक लोकसभेत मंजूर झाला.