अमित शहांपासून आमच्या जीवाला धोका-हार्दिक पटेल

0

गांधीनगर- मागील आठवड्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. यावर पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे. अमित शहा यांच्या जीवाला धोका आहे असे म्हणणे म्हणजे सर्वात मोठी खोटी बाब आहे. अमित शहांच्या जीवाला धोका नसून त्यांच्या पासून आमच्या जीवाला धोका आहे अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी टीका केली आहे. ट्विटर वरून त्यांनी ही टीका केली आहे.