अमित शहा आडवाणी, मुरली मनोहर जोशींची नाराजी दूर करणार; आज घेणार भेट !

0

गांधीनगर:भाजपच्या संस्थापक सदस्य असलेले लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना यावेळी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आलेली नाही, त्यामुळे हे दोन्ही वरिष्ठ नेते पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे. लालकृष्ण आडवाणी यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी मिळालेली आहे. दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आज लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेणार आहेत. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या मनातील नाराजी दूर करण्यासाठी अमित शाह आडवाणी आणि जोशी यांची भेट घेणार आहेत.

पक्षाला मोठे करण्यात आडवाणी आणि जोशी यांची भूमिका महत्त्वाची होती. मात्र त्यांनाच डावलण्यात आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर चौफेर टीका सुरु आहे. ज्येष्ठ नेत्यांना पक्षात अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप दोघांवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शाह यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.