अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धातास चर्चा !

0

मुंबई: महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस उलटल्यानंतर देखील संपलेला नाही. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली, चर्चा संपली असून मुख्यमंत्री बाहेर पडले आहे. मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आहे. राजकारणासहित महाराष्ट्रात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्र्यांची ही भेट मानली जात आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात अमित शहा यांची भूमिका महत्त्वाची आहे. सत्ता स्थापनेचा युतीतील तिढा सुटत नसल्याने अमित शहा यांनी मध्यस्थी करून तिढा सोडवावा यासाठी देखील मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेतली आहे.