नवीदिल्ली : एक्झीट पोलचे आकडे चक्रावून सोडणारे आहेत. प्रामुख्याने उत्तरप्रदेशात राहूल व अखिलेश या तरूणांमुळे राजकीय चित्र बदलणर अशी हवा गेल्या महिन्यात निर्माण करण्यात आलेली होती. त्यामुळेच उलटसुलट चर्चा होत राहिली. किंबहूना या दोन तरूणांना युपीके लडके ठरवून मोदींना उपरा ठरवण्यापर्यंत प्रचार गेला होता. पण मोदी नेहमीच आपल्यावरच्या टिकेचा प्रतिवाद उत्तम करतात. त्यांनी युपीके लडकेचा प्रतिवाद ‘गोद लिया बेटा’ असा करीत आपणच उत्तरप्रदेशचे दत्तक पुत्र असल्याचा दावा मांडला. तो फ़क्त शब्दाचा खेळ आहे की खरेच दत्तकपुत्र उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बनवण्याचा बेत आहे?
दोन एक्झीट पोल भाजपाला २५०-२७० पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. तेच खरे ठरले तर उत्तरप्रदेशी मतदाराला भूमीपुत्र राहुल अखिलेशपेक्षाही कोणी राज्याबाहेरचाच नेता पसंत असल्यावर शिक्कामोर्तब होईल. आणि तसे झाले तर मुख्यमंत्रीही राज्याबाहेरचा कोणी दत्तक घेतला जाण्यास हरकत नसावी. तिकडे पंजाबला दिल्लीचे केजरीवाल मुख्यमंत्री व्हायला जाणार आहेत. पाच वर्षापुर्वी भाजपाने मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना पुढे केले होते आणि चार महिन्यापुर्वी कॉग्रेसनेही दिल्लीच्या शीला दिक्षित यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून घोषित केले होते. मग भाजपाने तसाच पाही निर्णय घेतला तर?