नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे सदस्य असलेले खासदार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, कानिमोझी हे निवडून गेले आहे. त्यामुळे त्यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार होता. दरम्यान आज अमित शहा (गुजरात), रवी शंकर प्रसाद(बिहार), कानिमोझी (तामिळनाडू) यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.