जळगाव- राज्यात दुष्काळावर मात करण्यासाठी अमीर खान आणि टीम याचे पाणी फाऊंडेशन २०१६ पासून पाणलोट व्यवस्थापन विषयी नियोजन करून दुष्काळावर मात करत आहे हळूहळू राज्यातून देशात आणि देशातून जगात पाणी फाऊंडेशनचे नावलौकिक होत आहे.
पाणी फाऊंडेशन पाणलोट व्यवस्थापन विषयी प्रशिक्षण देऊन त्या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले जाते आणि या प्रक्रियेसाठी उत्तम प्रशिक्षकांची निवड पाणी फाऊंडेशन करीत असते. यावर्षी राज्यातून जवळपास प्रशिक्षक म्हणून २० हजार पेक्षा जास्त व्यक्तींनी अर्ज दाखल केली होते. या सर्वांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती यात 3 हजार प्रशिक्षक उत्तीर्ण झाले होते. त्यानंतर संवाद कौशल, मुलाखत व प्रत्यक्ष पाच दिवस स्नेहालय नगर जिल्ह्यात याना प्रशिक्षण देऊन अंतिम टप्प्यात १४० सामाजिक प्रशिक्षकाची निवड करण्यात आले यात जळगावचे भूषण लाडवंजारी यांची निवड झाली आहे.
भूषण लाडवंजारी हे गेल्या दहा वर्षे पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. यापूर्वी यांनी यशदाचे राज्य प्रशिक्षक, जिल्हा जलनायक, जिल्हा क्रीडा विभाग पुरस्कार निवड समिती सदस्य, समांतर विधी सहाय्यक, नेहरू युवा क्रेद्र सदस्य या सारख्या शासनाच्या विविध समित्यांवर त्यांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. नुकतेच हैद्राबाद प्रशिक्षण केंद्राकडून राष्टीय प्रशिक्षक म्हणून देखील त्यांची निवड झाली आहे. या प्रमाणे त्यांनी नेत्र दानावरील पुण्य नावाच्या लघुपटात मुख्य भूमिका पार पडली असून या लघुपटाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
या कामगिरीबद्दल त्यांना त्यांच्या तुळजाई संस्थेला शासनाचे दोन पुरस्कार व त्यांना वैयक्तिक राज्य शासनाच्या जिल्हा क्रीडा विभागाकडून २०१८ चा जिल्हा युवा पुरस्कार मिळाला आहे. पाणी फाऊंडेशनकडून भूषण लाडवंजारी यांचे सामाजिक प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल समाजकार्य महाविद्यलायचे प्राचार्य डॉ.वाय.जी.महाजन , कृषीभूषण सागर धनाड, सुनील वाणी, संजय बडगुजर, शिरीष तायडे तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.