अमुल्या लीयोनाचा अजून एक व्हिडिओ व्हायरल

0

बंगळुरु: बंगळुरु येथे नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत पाकिस्तान जिंदाबादचा नारा लावणाऱ्या अमुल्या लियोनबाबत सध्या वाद सुरु आहे. यातच या मुलीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये म्हणते की, मी एकटी नाही, मी जे बोलते आणि करते त्यांच्यामागे बरेच लोक काम करत आहेत. मी फक्त एक चेहरा आहे. मात्र हा व्हिडिओ ‘पाकिस्तान झिंदाबाद’ च्या घोषणेपूर्वीचा आहे. अमुल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन औवेसी यांनाही टार्गेट करण्यात येत आहे.

‘आज मी जे काही करत आहे ते मी करत नाही. मी फक्त चेहरा बनली आहे यासाठी मीडियाचे आभारी आहे. परंतु माझ्यामागे अनेक सल्लागार समित्या काम करतात, ते लोक जे सल्ला देतात की, आज तुम्हाला भाषणात हे बोलायचं आहे, हे मुद्दे आहेत, लिखाण सामग्रीवर काम केलं जातं, बरेच ज्येष्ठ कार्यकर्ते काम करतात. माझे आई-वडिल सांगतात, हे कसे बोलायचे आहे, असं करावे लागेल, येथे जावे लागेल. हा खूप मोठा विद्यार्थी ग्रुप आहे. बंगळुरू स्टूडंट अलायन्स या सर्व निषेध आंदोलनामागे कार्यरत आहे. मी फक्त त्याचा चेहरा आहे, परंतु बंगळुरू स्टूडंट अलायन्स प्रचंड मेहनत घेत आहे असं अमुल्या लोयोन व्हिडिओत म्हणतेय.

अमुल्याचे लोयोनाचे वडिल म्हणाले की, अमुल्याने सीएएच्या विरोधातील रॅलीमध्ये जाणं योग्य नव्हतं. मी तिला अनेकवेळा आंदोलनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र अमुल्याने माझं काही ऐकलं नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझ्या मुलीला तुरुंगात पडून राहू द्या. पोलिसांना जर योग्य वाटत असेल तर अमुल्याचे पायही तोडून टाका असं म्हणत तिच्या वडिलांनी संताप व्यक्त केला आहे.