‘अमूल’मुळे राज्यातील सहकारी दुग्धव्यवसाय संकटात : हिंगे

0

कात्रज । धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. कुरियन यांनीच स्थापन केलेल्या संस्थांनी केवळ व्यावसायिकताच अवलंबिण्यास सुरुवात केली असून सहकार व दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हितास दुय्यम स्थान देण्याचे धोरण राबविल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘अमूल’सारखी सधन सहकारी संस्था आज महाराष्ट्रातील सहकारी दुग्धव्यवसायावर अतिक्रमण करत आहे. यातून महाराष्ट्रातील सहकारी दुग्धव्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. ही मोठी शोकांतिका असल्याची खंत कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी व्यक्त केली.

धवलक्रांतीचे प्रणेते डॉ. वर्गिस कुरियन यांच्या 96व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या दुग्धव्यवसायातील कार्याची माहिती समाजात पोहोचविण्याच्या हेतूने डॉ. वर्गिस कुरियन यांचे जन्मगांव कोझीकोडे (केरळ) ते आणंद (गुजरात) अशी मोटारसायकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. रॅलीस सोमवारी (दि.20) प्रारंभ झाला. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कात्रज दुग्धालयात शुक्रवारी (दि.24) स. 8 वा. रॅलीचे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष हिंगे यांनी या रॅलीस झेंडा दाखविल्यानंतर रॅली पुढे रवाना झाली.

याप्रसंगी समीर नागले (अमूल झोनल इनचार्ज, महाराष्ट्र व गोवा), हिमांशू रॉय (अमूल, आणंद), अतुल सुरू (ब्रँच मॅनेजर पुणे), बी. मंडल (झोनल इनचार्ज अकाउंटस, महाराष्ट्र आणि गोवा), प्रणील जाधव (मार्केटिंग मॅनेजर, अमूल) व संघाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगे म्हणाले, डॉ. कुरियन यांनी राबविलेल्या दूध महापूर योजनेमुळेच आज दुग्धव्यवसायात आमुलाग्र बदल झाला असून दूध उत्पादक शेतकर्‍यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मोठी मदत झाली आहे. डॉ. कुरीरन रांच्रा तत्त्वानुसार सहकारी दूधसंस्थामध्रे त्रिस्तरीर पद्धतीने दूध संकलन झाले पाहिजे. ‘एक गांव एक दूध संस्था’ असावे. परंतु महाराष्ट्रामध्रे चार स्तरीर किंवा पाच स्तरीर पद्धतीने दुधाचे संकलन केले जाते. संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन कुमार मारणे यांनी केले. रविवारी (दि.26) राष्ट्रीय दुग्धदिन म्हणून साजरा केला जातो. कात्रज येथील मिल्क पार्लरवरून 6000 आइस्क्रीमचे मोफत वाटप करण्यात आले.