भुसावळ : शहरातील पिण्याच्या पाण्यासह विकासाच्या दृष्टीने संजिवनी ठरणार्या अमृत योजनेचे काम 15 डिसेंबर पर्यंत सुरु होण्याचे संकेत देण्यात आले. त्यासंदर्भात 16 रोजी पालिकेत अधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
याप्रसंगी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, महाराष्ट्र जिवन प्राधीकरण व जैन इरिगेशनचे अधिकारी उपस्थित होते. या योजनेत 11 टाक्या उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागा परिक्षण अधिकारी करतील. 230 किमीची पाईप लाईन टाकण्यात येणार आहे. त्या कामांचे नियोजन व रुपरेषा या बैठकीत आखण्यात आली असून या कामास लवकरच प्रारंभ होणार आहे.