अमृतसर- अमृतसरच्या राजासांसी परिसरातील आदिवाल गावात निरंकारी भवन येथे ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले आहे. येथील निरंकारी भवनामध्ये सत्संगाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी मंचाच्या दिशेने ग्रेनड फेकला. जखमींपैकी काही जणांचा प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.