अमृतसर: दशऱ्याला पंजाबमधील अमृतसर येथे रावण दहनाचा कार्यक्रमावेळी झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६१ जणांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेची चौकशी सुरु आहे. दरम्यान चौकशीतून या कार्यक्रमासाठी कोणतीही पूर्वी परवानगी घेण्यात आलेली नव्हती ही बाब समोर आली आहे. परवानगीशिवाय सुरक्षिततेची देखील व्यवस्था नव्हती.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणी दोषींवर ठोस कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. आयोजकांनी कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती त्यामुळे हा कार्यक्रम नियमानुसार नव्हता असे सांगण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की ३२ सेकंदात ६१ जणांना जीव गमवावा लागला. रेल्वे रुळाला लागून असलेल्या जागेवर हा कार्यक्रम सुरु होता.