अमृताच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या काही खास गोष्टी…

0

मुंबई : मराठी सिनेमातील एक नामांकित नाव म्हणजे अमृता खानविलकर. लावणी असो किव्वा अभिनय अमृता ही प्रत्येक दिग्दर्शकाची पहिली पसंत असते. ‘वाजले की बारा’ या लावणीवर सर्वांना ठेका धरायला लावणारी अमृताचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी…

अमृता खानविलकर ही, एक मुंबईकर आहे. तिने ‘झी टीव्ही’च्या ‘झी इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या कार्यक्रमातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या कार्यक्रमात तिने फक्त सहभागच घेतला नाही, तर तिसरा क्रमांकही पटकावला होता. त्यानंतर छोट्या पडद्यावरीलच ‘अदा’, ‘बॉलिवूड टुनाइट’, ‘कॉमेडी एक्सप्रेस’, अशा कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची जबाबदारीही तिने पार पाडली. त्यानंतर तिने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली. २०१५ मध्ये अमृताने हिमांशू मल्होत्राशी लग्न केले .

अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात ही तिने दमदार भूमिका केल्या आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या काशिनाथ घाणेकर मध्येही तिने ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’ या गाण्याला नवा साज चढवला.