अमृता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पालिकेतर्फे सत्कार

0

कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला

निगडी : यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनी अमृता विद्यालयातील या नऊ शाळकरी मुलींनी सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील कातळकडेचा खडतर तैलबेला किल्ला सर केला. तेथे भारताचा तिरंग फडकविला. मुलींच्या या कामगिरीमुळे सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो आहे. मुली आता कोणत्याच क्षेत्रात मागे नसतात. मात्र आता इतक्या लहान मुली देखील आपल्या शहराचे नाव उज्वल करीत आहेत. त्या भविष्यातही अशीच कामगिरी करतील, असे मत महापौर नितीन काळजे यांनी व्यक्त केले. महापालिकेतर्फे या मुलींचा सत्कार महापौर नितीन काळजे व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.

स्थायी समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास स्थायी समिती सभापती सीमा सावळे, अतिरिक्त आयुक्त प्रविण अष्टीकर, कला क्रीडा साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडी गटनेता कैलास उर्फ बाबा बारणे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या आशा धायगुडे-शेडगे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे, कोमल मेवाणी, अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, नगरसदस्य लक्ष्मण उंडे, कुंदन गायकवाड, हर्षल ढोरे, उत्तम केंदळे, अमित गावडे, बाळासाहेब ओव्हाळ, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह आदी उपस्थित होते.

एव्हरेस्टवीर कृष्णा यांचा सत्कार
अमृता विद्यालयातील 9 ते 11 वयोगटातील या मुली आहेत. यावेळी चेलूवी ढोकले, वैदही भोंगे, मानसी मगर, आकांक्षा पवार, श्रेया भदे, तानीक्षा पवार, वैष्णवी गवळी, मृणाल ठाकर, सई भालेघरे यांच्यासह मार्गदर्शक एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांचा सत्कार करण्यात आला.