अमृत चौकात एका तरुणाला जबर मारहाण

0

नंदुरबार । शहरातील अमृत चौकात एका तरुणाला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना दि.30 जुलैच्या रात्री घडली. आंबेडकर चौकात राहणारा कैलास आप्पा पेंढारकर हा अमृत चौकातील अंडापावच्या लॉरिवर आला,पहिले मला अंडापाव दे असे त्याने सांगितले. याचा राग आल्याने अल्पेश मराठे,योगेश राजपूत, कृष्णा राजपूत या तिघांनी पेंढारकर यास लोखंडी फायटर ने मारून जखमी केले अशी फिर्याद कैलास पेंढारकर याने पोलिसात दिली आहे त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन कारवाई केली.