मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांची पत्रकार परीषदेत माहीती
भुसावळ- शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची मार्गी लावण्यासाठी सुरू असलेल्या अमृत योजनेचे काम वेळेच्या आत पुर्ण करण्याची संबधीत ठेकेदाराला देण्यात आली आहे.तसेच शहरातील विविध प्रलंबीत विकास कामे मार्गी लावण्यात येणार असून शहराच्या खड्डेमय रस्त्यांची लवकरच दुरूस्ती होणार असल्याचे नगरपालीकेचे मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांनी पत्रकार परीषदेत सांगीतले. बुधवारी पालीकेचे मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांनी नगरपरीषदेच्या कार्यालयातील पत्रकार परीषदेत पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शहरातील नागरीकांची पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी अमृत योजनेचे काम वेळेच्या आत पुर्ण करण्याच्या सुचना संबधीत ठेकेदाराला देण्यात आली आहे.यामूळे भविष्यात शहरवासीयांना पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जावे लागणार नाही.तसेच अमृत योजनेच्या खोदकामामूळे रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे व मातीची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचीही सुचना ठेकेदाराला देण्यात आली असून शहरातील मुख्य रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे लवकरच डांबरीकरणाने दुरूस्त केले जाणार आहेत.यासाठी निवीदा काढण्यात आली असून शहरातील विविध प्रलंबीत विकास कामांचा आढावा घेवून ते सुद्धा मार्गी लावले जाणार असल्याचे सांगीतले.यावेळी त्यांनी शहरातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी कटीबद्ध असल्याचाही उल्लेख केला.
आव्हानात्मक कामे करण्यास आवडतात
शहरातील आव्हानात्मक कामे करण्यास आवडत असून शासन पाठवील त्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यास तयार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगीतले.तसेच अमृत योजनेतंर्गत शहरातील प्रत्येक नागरीकांना 24 तास शुद्ध स्वरूपाचा पाणीपुरवठा मिळावा यासाठी अॅटोमॅटीक यंत्रणा कार्यान्वित करण्याची योजना अंमलात आणली जाणार आहे.तसेच सद्यस्थितीत शहरातील गळती लागलेल्या जलवाहीनींच्या दुरूस्तीच्या कामाला प्राधान्य देण्यात आले असल्याचे सांगतीले.
ग्रीन स्पेस तयार करणार
अमृत योजनेच्या अटीनुसार शहरातील हनुमान नगर, सोमाणी गार्डन जवळील स्टेडीयम लगतचा परीसर,गणेश कॉलनी या भागात ग्रीन स्पेस तयार केला जाणार आहे.तसेच ग्रीन स्पेस व शहरातील उद्यानांचे सुशोभिकरण करून त्यामध्ये जाँगीग टॅ्रक व आकर्षक खेळणी बसवण्यात येतील.याच प्रकारे शहरातील चांगल्या कामांना प्राधान्य दिले असल्याने शहराच्या सौदर्यांत भर पडण्यास मदत होईल.
प्रलंबित वविध कामे लावली जाणार मार्गी
मुख्याधिकारी रोहीदास दोरकुळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना शहरातील विविध कामांची माहीती दिली यामध्ये पालीकेच्या सुसज्ज अशा नविन इमारतीसाठी प्रयत्न,जागेसंदर्भात रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार सुरू असून रेल्वे प्रशासनाला पर्यायी जागा दिली जाणार असून यासाठी जागेचे मुल्याकंन काढले जात आहे.पालीकेतील कामकाजामध्ये सुधारणा व पारदर्शकता यावी यासाठी करवसुलीवर भर देवून आधी कर्मचार्यांचे वेतन वेळेवर दिले जाईल. तसेच शहरात होत असलेल्या अतिक्रमणावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे.हॉकर्स झोनचा प्रश्न प्रस्तावीत असून शहरात निर्माण होणारी वाहतूकीची कोंडी दुर करण्यासाठी बंदावस्थेत असलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल अशा विविध समस्या मार्गी लावण्यासाठी शर्तीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगीतले.