अमृत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी रमणलाल गुजराथी

0

चोपडा । येथील चोपडा पीपल्स को.अ‍ॅाप.बँकेच्या अमृत महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी माजी चेअरमन व माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी यांची नियुक्ती बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी यांनी बँकेच्या सभागृहात समितीच्या बैठकीत केली. रमणलाल गुजराथी यांनी यापूर्वी पीपल्स बँकेच्या हिरक महोत्सवी समितीची धुरा देखील सांभाळली आहे. या बैठकीत बॅकेच्या अमृत महोत्सवासह माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांचा देखील अमृत महोत्सव सोहळा होणार असल्याने या विशाल कार्यक्रमाचे नियोजनबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी बॅकेचे व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, संचालक व्ही.डी.पारिक, नेमीचंद जैन,मिना देसाई, सुभाष गुजराथी, नगरसेविका अश्विनी गुजराथी, तसेच अमृत महोत्सव समितीचे अशोक गुजराथी, आशिष गुजराथी, प्रा.शामभाई गुजराथी, आदी सदस्य उपस्थित होते.