जळगाव। केंद्र शासन पुरस्कृत राज्यशासनाचा अमृत योजने अंतर्गत काम शहरास मंजूर पाणी पुरवठा योजनेच्या कामांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या ई-भूमीपुजन होणार होते. या योजनेच्या निविदा प्रक्रियेवर जैन इरिगेशन कंपनीने दाखल केलेल्या याचिकेवर औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी होती. सुनावणी पूर्ण झाली नसल्याने न्यायालयाने योजनेचे भुमीपूजन करू नये असे आदेश मनपाला दिले आहे.
जळगाव शहरास राज्यशासनाची अमृत योजने अंतर्गत 249 कोटीची पाणी-पुरवठा योजना मंजूर झाली आहे. त्यात पहिल्या टप्यातील 191 कामांसाठी आलेल्या निविदेत औरंगाबाद येथील संतोष इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. व विजय कन्ट्रक्शन प्रा. लि. ची. निविदा प्रशासनाने मंजूर केली होता. निविदा प्रक्रियेवर संशय घेवून जैन इरिगेशन कंपनीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेवून याचिका दाखल केली होती. यावर आज झालेल्या सुनावणीत जैन कंपनीने न्यायालयापुढे आपले म्हणणे सादर केले जात आहे. न्यायालयाचा वेळ संपल्याने न्यायालयाने जो पर्यंत सुनावणीपूर्ण होत नाही तो पर्यंत योजनेच्या भूमीपुजन करू नये असे मनपाला तसेच शासनाला आदेश दिले आहे.