भुसावळ। शहरासाठी मंजूर असलेल्या अमृत योजनेच्या तीन निविदा एमजीपीच्या निष्कर्षात पास (क्वालिफाय) ठरल्याने लवकरच या निविदा उघडण्यात येणार असून सभागृहाच्या मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार आहे. सुमारे 600 कोटी रुपयांच्या अमृत योजनेतून शहरात विविध विकासकामे होणार असून शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. अमृत योजनेच्या कामासाठी जैन ब्रदर्स तसेच पुणे व मुंबईतील कंपनीने निविदा सादर केली होती. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या निविदांतील कागदपत्रांची छाननी केली असून निकषात तीनही निविदा पास झाल्या आहेत. लवकरच या निविदा उघडण्यात येणार असून कमी खर्चाच्या निविदेला सभागृहाच्या परवानगीनंतर मान्यता देण्यात येणार आहे.
शहरवासीयांसाठी दिलासा ठरणार्या अमृत योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. कमी खर्चाच्या निविदेला प्राधान्य देऊन गुणवत्तापूर्व काम करणार्या ठेकेदारांना काम देण्यात येईल.
रमण भोळे, नगराध्यक्ष