अमॅझॉन, फ्लिपकार्टवरुन केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री

0

नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाउनदरम्यान अमॅझॉन, फ्लिपकार्टसह अन्य ई-कॉमर्स कंपन्यांना जीवनावश्यक नसलेल्या वस्तूंची विक्री करता येणार नसल्याचे केंद्र सरकारे स्पष्ट केले आहे. या पूर्वी केंद्र सरकारने ई-कॉमर्स कंपन्यांना २० एप्रिलपासून जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तू विकण्याची परवानगी दिली होती.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ट्विट करत हा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. सुधारित निर्देशांमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे करण्यात येणार्‍या गरजेच्या नसलेल्या वस्तूंची विक्री हटवण्यात आलेली आहे. यापूर्वी, ३ मे रोजी लॉकडाउनची मुदतवाढ झाल्यानंतर २० एप्रिलपासून मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप यांसारखी इलेक्ट्रॉनिक उत्पादने ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यासपीठावर उपलब्ध होतील असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, रस्त्यावर वाहन चालविण्याकरिता संबंधित प्राधिकरणाकडून या वस्तूंच्या वितरणाची मंजुरी घेतल्याशिवाय हे शक्य नव्हते. पण आता केंद्र सरकारने आपल्या गाइडलाइनमध्ये बदल केले आहेत.