अमेझॉनला पीपीआयसाठी आरबीआयचा परवाना

0

मुंबई। भारतीय रिझर्व्ह बँकेने ई कॉमर्स कंपनी अमेझॉनला देशात प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) किंवा मोबाईल वॉलेट सुरू करण्यासाठीचा परवाना दिला आहे. यामुळे भारताच्या डिजिटल पेमेंट क्षेत्रात अमेझॉन प्रवेश करू शकणार आहे. तसेच फ्लिपकार्टच्या फोन पे व अलिबाबाच्या पेटीएमला तगडी स्पर्धाही निर्माण करू शकणार आहे.

या सुविधेमुळे कंपनीला भारतात वेगाने वाढत चाललेल्या पेमेंट बाजारात प्रवेश करता येत असल्याचे व ग्राहकांना सुविधापूर्ण व विश्वासार्ह कॅशलेस पेमेंटचा अनुभव देण्याची संधी मिळाल्याचे अमेझॉनकडून सांगितले जात आहे. डिसेंबर 2016 मध्ये अमेझॉनने पे बॅलन्स्ड सर्व्हीस टू कॅश लाँच केली आहे. मात्र या सुविधेचा वापर फक्त अमेझॉन पोर्टलवरच करता येत होता. आता प्रीपेड परवाना मिळाल्यानंतर पेटीएम, मोबिक्वीक व अन्य वॉलेट प्रमाणे या वॉलेटचा उपयोग करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.