अमेठीतील स्मृती इराणींचे निकटवर्तीय माजी सरपंचाची हत्या;

0

अमेठी: उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील एका गावाचे माजी सरपंच स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या भाजपाच्या एका कार्यकर्त्याची घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सुरेंद्र सिंह असे हत्या करण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्याचे नाव आहे.

अमेठीतील बरौलिया गावाचे ते प्रमुख होते. शनिवारी रात्री उशीरा काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या राहत्या घरात घुसून त्यांची हत्या केली. उपचारासाठी त्यांना लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान स्मृती इराणी यांनी सुरेंद्र सिंह यांच्या परिवाराची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.