अमेठी: काल लागलेल्या लोकसभेच्या निकालात देश वासियांचे लक्ष अमेठी या मतदार संघावर लागलेले होते. हा मतदार संघ हायप्रोफाईल मानला जात होता. कारण हा मतदार संघ कॉंग्रेसचा किल्ला होता. १९९१ पासून या मतदार संघात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत हा गड कॉंग्रेस कडून हिरावून घेत, भाजपाच्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत अमेठीवर विजय प्राप्त केला आहे. या विजयासह त्यांनी अमेठी साठी हि नवीन पहाट आहे असे ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केली आहे.
अमेठी मधील जनतेने विकासावर विश्वास दाखवत अमेठी मध्ये कमळ फुलवल्याचे त्यांनी आपल्या ट्वीट मध्ये केले आहे. तसेच आपल्या विजयाचे श्रेय त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याना दिले असून, राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल वर टीका करताना त्या म्हणाल्या कि, एकीकडे एक कुटुंब होते, तर दुसरीकडे एक संघटना. हि संघटना लोकांसाठी एखाद्या कुटुंबासारखेच काम करत होती. या वेळी केरळ आणि बंगालमध्ये प्राण गमावलेल्या आपल्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिले.
भाजपच्या स्मृती इराणी यांनी कॉंग्रेसचे राहुल गांधी यांचा ५५, १२० मतांनी पराभव केला आहे. स्मृती इराणी यांना ४, ६७, ५९८ मते मिळाली, तर राहुल गांधी यांना ४, १३, ३९४ मते मिळाली आहे. या मतदार संघात २००४ पासून राहुल गांधी हे विजयी होत असून २०१४ च्या निवडणुकीत राहुल यांनी स्मृती यांचा १, ०७, ९०३ इतक्या मतांनी पराभाव केला होता.