भुसावळ- बेंगळुरू येथे झालेल्या एमटीसी ग्लोबलच्या आठव्या जागतिक शिक्षण परीषदेत अमेय अग्रवाल यांना आऊटस्टँडिंग यंग मोटिव्हेशनल स्पीकर एक्सलंस पुरस्काराने गौरवण्यात आले. नितीन गर्ग (बेंगळुरू), डॉ.भोलानाथ दत्ता, डॉ.राहस्मान (मलेशिया), डॉ.अॅलेक्स फिलिप्स (युएसए), डॉ.फरशुद्दीन (ढाका), डॉ.झा (नेपाळ) डॉ.चौधरी (कुलगुरू, ढाका) यांची विशेष उपस्थिती होती. एमटीसी ग्लोबल ही जगभरातून 30 हजारांपेक्षा जास्त सभासद असणारी संस्था असून संयुक्त राष्ट्र संघाने प्रशससिलेल्या या आठव्या परीषदेत जग भरातून सुमारे 250 प्राध्यापक, कुलगुरू, संशोधक, व्यवस्थापन सल्लागार व कॉर्पोरेट नेते उपस्थित होते. अमेय अग्रवाल हे अ लीप विदीन पुस्तकाचे लेखक व मोटीवेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध आहेत.